वैद्यकीय क्षेत्रातील सातत्या, २४ तास वैद्यकीय सुविधा, निरंतर सेवाभावी वृत्ती विचारात घेऊन नारायणगाव येथील जीवन मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. लहू खैरे यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय आरोग्य भूषण पुरस्कार २०२५ ने गौरविण्यात आले.